। चिरनेर । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा राजाराम म्हात्रे वय 78 यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि.20) निधन झाले. चिरनेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश म्हात्रे, पत्रकार सूर्यकांत म्हात्रे व प्रशांत म्हात्रे यांच्या त्या मातोश्री होत्या, तर सेवानिवृत्त शिक्षक राजाराम म्हात्रे यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचे अध्यापन कौशल्य उत्तम असल्यामुळे त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले असून ते विद्यार्थी चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मागे पती, तीन पुत्र, सुना, नातजावई, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे.