भारताचे माजी क्रिकेटपटू दुर्राणी यांचं निधन

। गुजरात । वृत्तसंस्था ।

आज (दि.2) भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं गुजरातमधील जामनगर येथे निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अफगाणिस्तानातून येऊन भारताकडून क्रिकेट खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.

सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. भारतीय संघासाठी, त्यांनी एकूण 29 कसोटी सामने खेळले आणि त्यात 1202 धावा केल्या. या 1202 धावांमध्ये एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी 75 विकेट्सही घेतल्या आहेत.

काबूलमध्ये जन्मलेल्या सलीम दुर्रानी यांनी १ जानेवारी १९६० रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. हा त्यांचा पदार्पणाचा सामना होता. दुर्रानी यांनी जवळपास १३ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळले आहे. ते असे फलंदाज होते जे चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकत. याशिवाय सलीमने गोलंदाजीतही नाव कमावले. सलीम दुर्रानी यांनी केवळ कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी शेवटची कसोटी ६ फेब्रुवारी १९७३ रोजी इंग्लंडविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळली.

सलीम दुर्रानी यांनी १९६१-६२ मध्ये पाच सामन्यांच्या टेस्ट मालिकेत इंग्लड विरोधात भारताच्या ऐतिहासिक २-० ने मिळवलेल्या विजयात त्यांच्या महत्वाची भूमिका होती. त्यांनी कोलकात आणि मद्रास मध्ये आठ आणि १० विकेट घेतले होते. दुर्रानी त्यांच्या खास ड्रेसिंग स्टाइलसाठी देखील ओळखले जात होते.

इंग्लड विरोधात ऐतिहासिक विजयानंतर तब्बल एका दशकानंतर सलीम दुर्रानी आंनी पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्टइंडीज विरोधात क्लाइव लॉड आणि गारफील्स सोबर्स यांना आऊट करत भारताला विजय मिळवून दिला होता. तसेच या स्टार क्रिकेटरने प्रसिद्ध अभिनेत्री प्रवीन बाबी यांच्या सोबत अभिनय करत बॉलिवुडमध्ये देखील काम केलं होतं.

Exit mobile version