। मुंबई । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन झाले आहे. त्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. शालिनीताई पाटील या 94 वर्षाच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. शनिवारी (दि.20) दुपारी माहिम येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन
