चित्रलेखा पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबियांची सांत्वनपर भेट
| अलिबाग | प्रतिनिधी |
कुरुळ येथील सामाजिक कार्यकर्ते, दिनेश कृष्णा पाटील यांच्या पत्नी, कुरुळ ग्रामपंचायतच्या माजी सदस्या दर्शना (अलका) पाटील यांचे दि.13 जून रोजी निधन झाले. त्यांच्यावर कुरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या मितभाषी, मनमिळाऊ स्वभावाच्या, सर्व कार्यांत हिरीरिने सहभाग घेणाऱ्या दर्शना पाटील निधना समयी 55 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अंत्ययात्रेला अनेक सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मंडळी, कुरुळ येथील ग्रामस्थ, माजी सरपंच, माजी सदस्य, नातेवाईक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती दिनेश पाटील, मुलगा ॲड. विनीत पाटील, मुलगी पर्णवी पाटील, इतर कुटुंबिय आणि मोठा पाटील परिवार आहे. त्यांचे दशविधीकार्य सोमवार दि.22 जून रोजी कुरुळ तलाव येथे होणार आहेत. निधनाची वार्ता समजताच शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा नृपाल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी अवधूत पाटील, श्रीकांत पाटील, प्रदीप पाटील, अमोल नाईक, हर्ष ढवळे, रोहण पाटील, नितेश पाटील, अभिजीत घाडगे आदी उपस्थित होते.







