माजी खासदार चंदन मित्रा कालवश

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार चंदन मित्रा कालवश झाले आहेत. त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. ते मित्रा द पायनियरचे संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक होते.

मित्रा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निकटवर्तीय होते. ऑगस्ट 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. जून 2010 मध्ये ते मध्य प्रदेशमधून भाजपाकडून राज्यसभेत निवडून आले. 2016 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य राहिले. जुलै 2018 मध्ये मित्रा यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि ते तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) सामील झाले होते.


चंदन मित्रा जी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि अंतर्दृष्टीमुळे कायम स्मरणात राहतील. राजकारणासोबतच माध्यमांच्या जगातही त्यांनी स्वतःचे वेगळं स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे मी दुःखी असून त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
पंतप्रधान नरेंद्र मोदी

Exit mobile version