परीक्षा घोटाळ्याप्रकरणी माजी अध्यक्ष अटकेत

पुणे | प्रतिनिधी |
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखरेदव ढेरे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच बंगळुरुमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुखालाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. .या कारवाईमुळे आणखी मोठ्या अधिकार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुखरेदव ढेरे यांना संगमनेर येथून पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तर बंगळुरू येथून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्‍विनकुमार यांनाही अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे

Exit mobile version