उर्णोलीचे माजी सरपंच बाबूराव पाटील कालवश

पेण | वार्ताहर |
पेण उर्णोली ता. पेण येथील माजी सरपंच बाबूराव कमळ पाटील यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले.मृत्यूसमयी ते 90 वर्षांचे होते. ते उर्णोली गावचे ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक व उर्णोलीचे कार्यकर्ते होते. त्यांनी सरपंच असताना गावातील कार्यकर्ते व लोकनेते यांच्या सहकार्याने गावात उर्णोली ते सोनखार असा रोड आणून गावात एस.टी. ही आणली सेझ च्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला.
त्यांचा मोठा मुलगा डॉक्टर आहे. नात पेण मधील उपजिल्हा रुग्णालयात कोविड जून 2020 पासून वैद्यकीय सेवा देत आहे. बाबूराव पाटील यांच्या समाजसेवेचा वसा त्यांची पुढील पिढी प्रामाणिक चालवत आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक, शैक्षिणीक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version