माजी सरपंच पदू म्हात्रे कालवश

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
आदई गावचे माजी सरपंच पदू गणू म्हात्रे यांचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी त्यांच्या हयातीत लोकनेते दि. बा. पाटील व दत्तूशेठ पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून शेतकरी कामगार पक्षाचे काम केले आहे.
पदू म्हात्रे सलग 15 वर्ष आदई गावचे सरपंच पद भुषविले. या कालावधीत ग्रामपंचायत क्षेत्रातील अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले. पनवेल तालुक्यातील सहकारी भात गिरणीचे चेअरमन म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. त्याचबरोबर पनवेल विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अनेक वर्ष सक्रिय सदस्य होते.

Exit mobile version