सर्वोदय विद्यालयात माजी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्य वाटप

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील सुडकोली येथील सर्वोदय विद्यालयात शनिवारी (दि. 27) माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सक्षम व्हावा तसेच गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमासाठी सुशांक मोरे, गणेश गोसावी, रविंद्र माळी, गणेश माळी, नितीन माळी, संदीप म्हात्रे, महेश माळी, भरत गोसावी, वसुधा तांबडकर, स्वप्नील तेलगे, प्रितम तेलगे, विशाल म्हात्रे, भरत म्हात्रे, आंबादास वाघमारे, सुनील ठाकूर, महेश तांबडकर, नरेश पाटील, नरेश माळी, कल्पना भुरे मोरे, सचिन वावेकर, अविनाश वावेकर, योगिता मोरे-ठाकूर, कांचन गायकर, हितेश मोरे, रत्नकांत गायकर, हरेश म्हात्रे, निलेश माळी, प्रशांत जोशी खारकर, जयवंत खारकर, विवेक मढवी, पूजा तांबडकर-पारंगे, मिनाक्षी तांबडकर-पाटील आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद भोईर होते. यावेळी उपाध्यक्ष सदाशिव तांबडकर, खजिनदार वसंत भुरे, संचालक नामदेव तांबडकर तसेच सदस्य मंडळी उपस्थित होती. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभना म्हात्रे व शिक्षकवृंद यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.

Exit mobile version