। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल वाळण येथील 1988-89 च्या बॅचमधील काही माजी विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.14) अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याला भेट दिली. याभेटी दरम्यान ॲड. कैलास पवार, उद्योजक प्रशांत कालगुडे, माजी सैनिक चंद्रप्रकाश ओमले, प्रकाश जाधव, रविंद्र कालगुडे, गंगाराम गोडावळे, विक्रम उत्तेकर, विठ्ठल बेंदुगडे, शांताराम कालगुडे, वाहन चालक संदिप नरे आदि उपस्थित होते.
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग येथे कार्यरत असलेले बेंदुगडे यांच्या विनंतीस मान देऊन सर्व माजी विद्यार्थी अलिबाग येथे कुलाबा किल्यास भेट देण्याकरिता आले होते. त्यानुसार त्यांनी अलिबाग येथील विविध ठिकाणच्या बीच, पर्यटन स्थळाला भेट देवून आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी चर्चासत्रात विविध विषयांवर आपली मनोगते व्यक्त केली. तसेच या भेटीदरम्यान सर्व मित्रांनी अलिबाग येथील विविध ठिकाणच्या बीच, पर्यटन स्थळाला भेट देऊन मनमुराद आनंद घेतला. दुपारी स्नेहभोजन करुन सर्व मित्रमंडळी आपल्या महाड तालुक्यातील मूळ गावी जाण्यासाठी निघाले.







