महाड- पोलादपूरमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
| महाड । प्रतिनीधी |
कोकण शिक्षक मतदार संघाचे कार्यसम्राट माजी आ. बाळाराम पाटील यांच्यातर्फे वचनपूर्ती सोहळा या निमित्ताने महाड- पोलादपूर तालुक्यातील माध्यमिक विद्यालयांना बुधवार (21) प्रिंटर प्रदान करण्यात आले. या प्रिंटर वितरणाच्या समयी रायगड शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जगताप, महेंद्र पाटेकर, प्रभाकर म्हामुणकर, संजय मेहता, धनंजय देशमुख, प्रफुल्ल धोंडगे, बंटी पोटफोडे, डॉ. सुरेश येरुणकर, शंकर राठोड, अरूण उतेकर, देवा पाटील तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी धनंजय देशमुख यांनी कार्यसम्राट माजी शिक्षक आ. बाळाराम पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. महाड-पोलादपूर तालुका निरीक्षक देवा पाटील यांनी बाळाराम पाटील यांच्या विषयी विचार मांडताना सांगितले की, पाटील निवडून आल्यापासून कोकणामध्ये जवळजवळ सर्वच अनुदानित हायस्कूलना प्रिंटर, प्रोजेक्टर, संगणक , मायक्रोस्कोप, विज्ञान, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले होते. प्रिंटर देखील वाटप केले जातील असे सांगितले होते तोच वचनपूर्ती सोहळा संपन्न करताना त्यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपलेले आहे.
शिक्षकांचे प्रश्न शाळांच्या, समस्या, आंदोलने, संप, मोर्चामध्ये प्रखर पाठिंबा आणि जोपर्यंत माझ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत माझ्याही आमदारकीची पेन्शन मी घेणार नाही असे रोखठोकपणे सांगणारे माजी आ. पाटील यांचे कौतुक केले तसेच शिक्षकांच्या सुख दुःखाला कधी आवाज द्या पाटील सदैव खंबीरपणे उभे राहतील असे सागण्यांत आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधाकर सावंत माध्यमिक विद्यालय महाडच्या मुख्याध्यापिका सौ निकम, गणेश शेडगे, विकास गायकवाड,श्री ईनामदार, श्री सुनील जाधव इत्यादीने परिश्रम घेतले. एकूण 32 हायस्कूलला प्रिंटर वाटप करण्यात आले.