| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवी दिल्लीतून मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेदिक विज्ञान संस्था (एम्स) मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जगदीप धनखड हे 74 वर्षांचे आहेत. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धनगड हे शनिवारी (दि.10) दोनदा बाथरूममध्ये बेशुद्ध पडले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखस करण्यात आले. आता त्यांच्या काही चाचण्या केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. जगदीप धनखड यापूर्वी अनेक वेळा बेशुद्ध पडले आहेत. ते कच्छचे रण, उत्तराखंड, केरळ आणि दिल्लीत बेशुद्ध पडले होते. या सर्व ठिकाणी उपराष्ट्रपती म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली असताना या घटना घडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव 21 जुलै रोजी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. आता राजीनाम्यानंतरही ते बेशुद्ध पडत असल्याचे समोर आले आहे.
माजी उपराष्ट्रपतींची प्रकृती बिघडली
