आम्ही पिरकोनकर समुहतर्फे किल्ले बनविण्याची स्पर्धा

| चिरनेर । वार्ताहर ।

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा ध्यास मुलांमध्ये निर्माण् व्हावा यासाठी उरण तालुकास्तरीय गड किल्ले प्रतिकृती स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही पिरकोनकर समूह या समूहाच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यास्पर्धेसाठी रेडीमेड किल्ल्यांचा वापर करता येणार नाही. तसेच स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धकांना 20 ऑक्टोबर पूर्वी नोंदणी करावी लागेल.

तर 23 ऑक्टोबर रोजी किल्ला परीक्षणासाठी तयार केलेला असावा. स्पर्धेसाठी कोणतेही साहित्य आयोजकांकडून पुरविले जाणार नाही. इको फ्रेंडली किल्ल्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल. किल्ल्यासाठी योग्य जागा स्पर्धकांनी निवडावी. स्पर्धेसाठी किल्ला तयार करताना एक किंवा त्याहून अधिक स्पर्धकांना एकत्रितपणे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी चेतन गावंड 9819759105, गिरीश पाटील 9870429677, तुषार म्हात्रे 9820344394, दिलखुश पाटील 9594937424, राजेंद्र ठाकूर 9870698644, सुरेंद्र गावंड 9930184766, समीर गावंड 9820848156, भूषण गावंड 9594872478, हेमंत गावंड 9594363482, मनोहर म्हात्रे 7208183176, प्रमोद पाटील 916723 0113, रवींद्र गावंड 9920 692221, राकेश गावंड 9167482070, विनायक गावंड 9076371563 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version