सारडे विकास मंचतर्फे गडकिल्ले स्पर्धा संपन्न

| उरण | वार्ताहर |

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे देवालय म्हणजे गडकोट किल्ले आणि या गडकोट किल्ल्यांची चिमुकल्यांना माहिती व्हावी त्यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक राज महेश घरत तर द्वितिय क्रमांक निल सुशांत म्हात्रे यांनी पटकवला. या स्पर्धेत एकूण 45 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सारडे विकास मंच आयोजित या स्पर्धेत ज्या मुलींनी किल्ले स्पर्धेत सहभाग घेतला अशा पाच मुलींना महेश पाटील यांच्याकडून बक्षीसे देण्यात आली, तर सहभागी सर्व स्पर्धकांना रोहित पाटील यांच्याकडून सन्मानित करण्यात आले.

गेले आठ वर्ष सारडे विकास मंच विविध क्षेत्रात काम करीत आहे. गड किल्ले बनवण्याच्या स्पर्धेचा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या मनात गडकिल्ल्यांंविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहेत. या कार्यक्रमास शिव व्याख्याते धिरद्र ठाकूर हे उपस्थित होते. सर्व स्पर्धकांना त्यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचा तसेच त्यांच्या मराठा आणि आगरी कोळी मावळ्यांची माहिती देऊन नवचैतन्य निर्माण केले. याप्रसंगी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन संस्था प्रतिनिधी रणीता ठाकूर, हरिश्चंद्र म्हात्रे, गडप्रेमी गणेश भोईर, सदाबहार दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष तुकाराम गावंड, सदस्य हरीश म्हात्रे, कैलास पाटील, संतोष जोशी, सचिन पाटील, विजय गावड, संदेश पाटील, स्नेहा पाटील, रुपाली म्हात्रे, रीया म्हात्रे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version