| उरण | प्रतिनधि |
उरण तालुक्यातील सारडे विकास मंच आणि कोमनादेवी ऑक्सिजन पार्कतर्फे मुलांना गडकिल्ल्यांचे महत्व आणि माहिती प्राप्त व्हावी, यासाठी दरवर्षी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात स्पर्धा संपन्न झाली. यावेळी स्वराज्याचे तोरण ज्यांनी बांधले त्या छत्रपती शिवरायांच्या, ज्यांनी या स्वराज्य रक्षकाला जन्म दिला त्या जिजाऊंच्या आणि जे मुघलांपुढे अखेरच्या श्वासापर्यंत झुकले नाहीत त्या छत्रपती संभाजी राजांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला. या स्पर्धेत 55 स्पर्धकांनी सहभाग दर्शविला होता.
यावर्षी या स्पर्धेचा प्रथम मानकरी राज घरत हा ठरला आहे. त्याने कोंढाणा किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. तर, द्वितीय मानकरी श्रीवेद म्हात्रे हा ठरला असून त्याने सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली होती. तसेच, उत्तेजनार्थ स्वरूम पाटील हा ठरला असून, त्याने अजिंक्य तारा किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली होती. विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, इतर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच स्पर्धंकाना रोहित पाटील याच्या तर्फे भेट वस्तू देण्यात आल्या.
या स्पर्धेदरम्यान प्रशांत म्हात्रे यांनी शिवरांयाचे गडकिल्ल्यांमध्ये महत्वाची माहिती दिली. तर, किशोर पाटील यांनी ‘स्वर हे माझे’ हा संगीतमय कार्यक्रम सादर केला. त्याचबरोबर सोनारी येथील राकेश कडू यांच्या मार्फत या स्पर्धेतील विजेत्या मुलांची शैक्षणीक दिली गेली. या अनोख्या संकल्पनेमुळे राकेश कडू याचे उपस्थितांनी आभार मानले. या कार्यक्रमाला वशेणीचे माजी सरपंच प्रसाद पाटील, सुयश क्लासेस आवरे अध्यक्ष निवास गावंड, हरिश्चंद्र म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, किशोर पाटील, हरीश म्हात्रे, त्रिजन पाटील, हेमंत पाटील, गणेश पाटील, हरिश्चंद्र पाटील, विकी पाटील, स्नेहा पाटील, रुपाली म्हात्रे, रिया म्हात्रे, अक्षता पाटील, निल म्हात्रे, राजेश पाशी व आद्या पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रशांत म्हात्रे यांनी केले. तर, आभार प्रदर्शन नागेंद्र म्हात्रे यांनी केले.




