टायर चोरीप्रकरणी चार आरोपी जेरबंद

| पनवेल | वार्ताहर |
अपोलो कंपनीच्या महागडे टायरच्या चोरीप्रकरणी चार आरोपींना पनवेल तालुका पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्या अटकेमुळे अजूनही चोरीच्या गुन्ह्याची उकल होणार आहे. हनुमान सुरनूर (30) याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर नंबर एमएच 21 बीएच 3216 हा टाटा मोटर्स, बच्चु डिझेल ऑथराईज सर्विस सेंटर, आजिवली, शेडुंग बायपास रोड, पनवेल येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये पार्क करून ठेवला असताना त्यातील 69,000/- रू. किमतीचे तीन टायर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

या घटनेची तात्काळ दखल घेत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शखाली पोनि अंकुश खेडकर, सपोनि विवेक भोईर, सपोनि संजय गळवे, पोहवा सुनील कुदळे, पोहवा महेश धुमाळ, पोना पंकज चंदिले, पोना मोकल व पोना प्रकाश मेहेर आदींच्या पथकाने तांत्रिक तपासद्वारे तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे पनवेल परिसर व भोसरी, पुणे परिसरातून या गुन्ह्यातील आरोपी विकास डोंगरे (26), वैभव खळगे (22), विशाल पवार (21) तसेच राजेश नागापुरे (31) यांना जेरबंद करण्यात आले आहे.

Exit mobile version