| रायगड | प्रतिनिधी |
कोकण विभागीय लोकशाही दिनात सोमवारी (दि. 9) चार अर्ज निकाली काढण्यात आले. सामान्य प्रशासनाचे उपायुक्त अमोल यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या लोकशाही दिनात नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यांच्या समस्या जाणून प्रकरणे उचित कार्यवाहीसाठी संबंधित कार्यालयांकडे पाठविण्यात आली. यावेळी विभागीय स्तरावरील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागीय स्तरावर आतापर्यंत झालेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात एकूण प्रलंबित अर्जांची संख्या दहा असून, आज आलेल्या अर्जांची संख्या दोन आहे, असे एकूण 12 अर्ज प्राप्त होते. त्यापैकी चार अर्ज निकाली काढण्यात आले असून, आठ अर्ज प्रलंबित आहेत.