घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक 

| नवीन पनवेल | प्रतिनिधी ।

घरफोडी करणाऱ्या चार आरोपींना खांदेश्वर पोलिसांनी अटक करत त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणले. 12 सप्टेंबर रोजी विजय लक्ष्मी इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर मालेवाडी स्टॉप सुकापुर या ठिकाणी चोरांनी दुकान फोडून मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरी केली होती. याबाबतचा गुन्हा खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून एका आरोपीला ताब्यात घेतले त्यांनी आणि त्याच्या साथीदार यांनी मिळून हा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली. नहीद आलम मोहम्मद जलाल रा. सुकापुर, तजमुल कमरुल खान रा. सेक्टर 19 वाशी, अश्फाक असदुद्दीन आलम (वाशी), नाझीम मोहम्मद जलाल शेख (वाशी, सेक्टर 19) नावे आहेत. त्यांच्याकडून खांदेश्वर येथील चार गुन्हे, पनवेल शहर येथील दोन गुन्हे, रबाळे एमआयडीसी मधील तीन गुन्हे असे नऊ गुन्हे उघडकीस आले. आरोपींवर यापूर्वी तुर्भे, खांदेश्वर, रबाळे, एपीएमसी, विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

Exit mobile version