शिवसमाधीजवळ पूजाविधी करणारे चौघे अटकेत

चार दिवसांची पोलीस कोठडी
। महाड । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असणार्‍या किल्ले रायगडवरील शिवसमाधीजवळ अस्थि आणि राखेसह पूजाविधी करणार्‍या चौघांविरुद्ध महाड तालुका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कारवाई करण्यात असून, न्यायालयाने या आरोपिंंना ार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये इतिहास अभ्यासक आणि व्याख्याते सौरभ करडे, शैलेश वरखडे ,ओंकार घोलप, किरण जगताप यांचा समावेश आहे. 8 डिसेंबर रोजी हे चौघे रायगडवरील शिवसमाधीजवळ एका पुस्तकाचे पूजन करताना आढळून आले होते.
यांच्याजवळ असलेल्या साहित्यात अस्थि आणि राख सदृश्य साहित्य आढळल्याने, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक पूजा झोळे, वैशाली बेलदरे पाटील आणि प्रदीप बेलदरे पाटील यांनी हा पूजा विधी उधळून लावला. या पूजेच्या माध्यमातून शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थि आणि रक्षा या ठिकाणी ठेवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
याप्रकरणी पूजा झोळे यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रीच त्यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास उपविभागिय पोलीस अधिकारी निलेश तांबे करित आहेत.

Exit mobile version