। ठाणे । प्रतिनिधी ।
बदलापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला गेलेल्या चौघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने उल्हास नदीत बुडून मृत्यू झाला आहे.
बदलापूरमधील चमटोली परिसरातील पोद्दार संकुलात राहणारे चार जण धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला उल्हास नदीत पोहायला गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. आर्यन मेदर(15), आर्यन सिंग (16), सिद्धार्थ सिंग (16), ओमसिंग तोमर (15) अशी मृत मुलांची नावं आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने चौघांचे मृतदेह बाहेर काढले. चौघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.