पीएमपीच्या धडकेत चार गाईंचा मृत्यू

। पुणे । प्रतिनिधी ।

कोंढणपूर-शिवापूर मार्गावर शुक्रवारी (दि.10) एका पीएमपीने गाईंच्या कळपाला जोरदार धडक दिली. यात कळपातील चार गाईंचा मृत्यू झाला, तर अनेक गाई जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी पीएमपी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
.
हा अपघात कोंढणपूर-शिवापूर मार्गावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडला. कोंढणपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपी बसने बारा गाईंच्या कळपाला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत चार गाईंचा मृत्यू झाला, तर अनेक गाई जखमी झाल्या. स्थानिकांनी या घटनेची माहिती तात्काळ शिवापुर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी पीएमपी बस चालकाला ताब्यात घेतले.

Exit mobile version