चार दिवस पावसाचे

हवामान विभागाचा इशारा

| मुंबई | प्रतिनिधी|

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून, त्यामुळे पुढील चार दिवसात तळ कोकणासह राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. किनारपट्टीवर मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून, शेतकऱ्यांची चिंता मिटण्याची आशा आहे.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पुढील चार, पाच दिवस पाऊस पडणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाडा अन्‌‍ इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु झाला आहे. गेले काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज सकाळपासून पावसाचा पाऊस जोर वाढला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

बळिराजा सुखावणार
राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी पावसाची तूट असल्याचं चित्र आहे. पेरण्यांना ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे, तर कुठे दुबार पेरण्या होत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेतकरी काहीसा सुखावणार आहे.

Exit mobile version