पनवेल परिसरातील चौघांचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल शहराजवळील हॉटेल गार्डन समोरील सिग्नलजवळून दुचाकीवरुन रेणुकुमारी धनंजयकुमार (42 रा.कामोठे) या चालल्या असताना अज्ञात वाहनाची धडक त्यांच्या गाडीला बसल्याने झालेल्या त्यात त्याचा मृत्यू झाला. गव्हाण फाटा परिसरात भंगार वेचण्यासाठी गेले असताना एका डंपर चालकाने माती खाली करताना कोणाला काही न सांगता डंपर वर केला. यावेळी डंपरमधील दगड डोक्याला लागून ओबेदुल्लाह अब्दुलमजीद चौधरी (42) यांचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे. तर तिसर्‍या घटनेत मुंबई-पुणे मार्गावर कामोठे येथील उड्डाणपुलाच्या सुरुवातीला घडलेल्या पहिल्या अपघातात राहुल दुर्गानंद झा (27) या तरुणाचा मृत्यू झाला. तर चौथ्या घटनेत मुंबई-गोवा महामार्गावर शिरढोण गावच्या हद्दींत रस्ता ओलांडणार्‍या समर बसु मतारी (30) जेडब्ल्युसी लॉजिस्टीक्समधून कामावरुन सुटल्यानंतर महामार्ग ओलांडून जात होता. यावेळी पनवेल कडून पेणच्या दिशेने जाणार्‍या भरधाव इर्टिगा कारने समर मतारी याला धडक दिली त्यात त्याचा मृत्यू झाला.

Exit mobile version