रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

| रायगड | क्रीडा प्रतिनिधी |

महाराष्ट्र क्रिकेट असो.च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंतिम पंच परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निकालात रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे चार पंच यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. त्यात उरणचे सुरेश म्हात्रे व रविंद्र म्हात्रे, अलिबागचे अभिजित वाडकर आणि रसायनीचे निशांत माळी यांनी एमसीए प्रमाणित पंच होण्याचा मान मिळवला आहे.

रायगड जिल्ह्यात क्रिकेट खेळाचे स्तर उचविण्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्यावतीने सातत्याने जिल्ह्यातील क्रिकेट पंचांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हे प्रशिक्षण शिबीर ऑनलाईन व प्रत्यक्ष कार्यशाळेच्या माध्यमातून घेण्यात आले असून, महाराष्ट्र क्रिकेट असो.च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पंच परीक्षेसाठीच्या पूर्व तयारी करीत हे प्रशिक्षण शिबीर अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. परिणामी गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात अठरा एमसीए प्रमाणित पंच तयार झाले आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचांना प्रशिक्षण शिबिरासाठी मुख्य प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून क्रिकेट नियमांचे तज्ज्ञ नयन कट्टा, माजी रणजीपटू व विद्यमान बीसीसीआयचे पंच हर्षद रावले, रुपेश खडगी, मुंबई क्रिकेट असो.चे पंच राजन कसबे यांनी बहुमूल्ये योगदान दिले आहे. दरम्यान, एमसीए पंच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व पंचांना रायगड जिल्हा क्रिकेट असो.चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version