कार्लेखिंडीत चारचाकी पलटी होऊन सातजण जखमी

। अलिबाग । वार्ताहर ।
रविवारी (दि.10) कार्लेखिंड येथे चारचाकी पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात वाहनचालकासोबत एकूण सातजण जखमी झाले. झुम कार रेनॉल्ट टिबर एम.एच.12 एस क्यु 9698 ही अलिबाग येथे येत असताना कारचा पुढील टायर फुटल्याने कार्लेखिंड येथील नाल्यात जाऊन ही गाडी पलटी झाली. या अपघातातील वाहनचालक उदयसिंग पलक, शंतनू सिंग, कानन बंन्सल, मनिष चैरसिया, मन्न जैन, दिशा थेरा, अरिब हयात अशी जखमींची नावे आहेत. तसेच जखमींवर प्रयाग हॉस्पीटल, कार्लेखिंड येथे उपचार सुरू आहेत. याबाबतचा पुढील तपास सफौ/पी.एस.सणस हे करीत आहेत.

Exit mobile version