| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंड येथे मालवाहू ट्रक पलटी होऊन दरीत कोसळला आहे. या अपघातात वाहनाचे प्रचंड नुकसान झाले असून चालकासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी ( दि.४) सकाळी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रक गुजरात येथून अलिबाग तालुक्यातील उसर येथील सॉम प्रोजेक्ट प्रा.लि. कंपनीत बांधकामासाठी सिमेंटचे ठोकळे घेऊन जात होता. मंगळवारी सकाळी कार्लेखिंड येथे आल्यावर ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक सुमारे बारा फूट दरीत कोसळून पलटी झाला. या अपघातात जखमी झालेल्या चालकासह दोघांना कार्लेखिंड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाताच वाहतूक पोलीस रुपेश शिर्के आणि नित्यानंद पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.