| रसायनी | वार्ताहर |
रसायनी- सावळे येथील ओढ्यावर मासेमारीसाठी गेलेल्यांना चार जणांनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि.24) रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे. रसायनी पोलीस ठाणे हद्दीत सावळे गावातील स्मशानभूमीजवळील पाण्याच्या ओढ्याजवळ तक्रारदार नरेश बाबुराव शिद (34) व साक्षीदार हे मासेमारीकरिता गेले असता मनात राग धरुन गोविंद माळी, संकेत माळी, ऋषिकेश माळी व चवथ्याचे नाव माहित नाही असे चार जणांनी नरेश बाबुराव शिद याला शिवीगाळ व दमदाटी करून संगनमत करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, दोन्ही पायावर लोखंडी रॉडची उपट टाकून दुखापत केली. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार मपोना शेळके मॅडम करीत आहेत.