56 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 19 एप्रिल रोजी कोरोनाच्या चार नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत 56 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल मनपा क्षेत्रात चार नवे रूग्ण आढळले.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 15 हजार 332 झाली आहे. यापैकी 2 लाख 10 हजार 578 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 698 वर गेला आहे. सद्यस्थितीत 56 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.