बारावीत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांचा खदानीत बुडून मृत्यू ; सुदैवाने एक बचावला

| नांदेड | वृत्तसंस्था |

नांदेड शहराजवळच्या झरी येथील खदानीत (खाणीत) बुडून चार युवकाचा मृत्यु झाल्याची दु:खद घटना आज दुपारी घडली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले चारही तरुण बारावीतचे विद्यार्थी होते. हे सर्वच मित्र शहरातील देगलुर नाका भागातील रहिवासी होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशमन पथकासह घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहिम सुरू केली होती. 

पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आज पाच मित्र फिरायला म्हणून झरी या ठिकाणी आले होते. त्यावेळी, फोटो काढण्यासाठी पाचजण खदानीत (खाणीत) खाली उतरले. फोटो काढल्यानंतर पाच पैकी चार जण पाण्यात उतरुन पाण्यात पोहोण्याचा, अंघोळ करण्याचा आनंद घेत होते. मात्र, खदानीतील (खाणीतील) पाण्याचा अंदाज न आल्याने हे चारही मित्र खदानीत (खाणीत) बुडाले. त्यानंतर, त्यांच्यासोबत गेलेल्या तरुणाने ही माहिती नातेवाईकाना कळवली. त्यानंतर, नातेवाईक व परिसरातील नागरिकांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलास व पोलीस यंत्रणांनीही घटनास्थळी धाव घेत खदानीत (खाणीत) बुडालेल्या चार मुलांचा सुरु करण्यात आला होता.  अग्निशमन दल आणि गोदावरी जीव रक्षक दलाच्या जवानानी दोन तास शोध घेऊन चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. या घटनेने नांदेड जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Exit mobile version