| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग येथील क्रीडा भूवनमध्ये नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा गुरुवारपासून सुरु झाल्या आहेत. पहिल्या दिवशी झालेल्या आठ संघाच्या सामन्यात चार संघ विजयी झाले असून ते सुपर एटमध्ये गेले आहेत. त्यात दोन अ व दोन ब गटातील संघाचा समावेश आहे.
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित तीन दिवसीय नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्या आहेत. अ, ब, क तसेच ड असे या गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटात चार संघाचा समावेश करण्यात आला आहे.
गुरुवार (दि.11) जानेवारी रोजी पहिल्या दिवशी अ गटातील एसपी भार्गवी इलेव्हन अलिबाग, अक्षया हॉटेल इलेव्हन अलिबाग, सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ चोढी, धर्मवीर ग्रुप दिघोडी तसेच ब गटातील एमडी वॉरिअर्स थळ, सिया वॉरिअर्स नागाव, मल्हार वॉरिअर्स अलिबाग आणि त्रीश्राव्या इलेव्हन वरसोली या आठ संघामध्ये सामने झाले. त्यात अ गटातील एसपी भार्गवी इलेव्हन, सरपंच पिंट्या गायकवाड मित्रमंडळ आणि ब गटातील एमडी वॉरिअर्स, त्रीश्राव्या इलेव्हन संघ विजयी ठरला असून त्यांची सुपर एटमध्ये निवड करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळपासून सुपर एटच्या संघामध्ये लढत होणार आहे. त्यात विजयी चार संघात सामना रंगणार आहे. अंतिम विजेता संघ अलिबाग चॅम्पीयन्स चषकाचा मानकरी ठरणार आहे. या संघाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाच्या संघाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या संघांना प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजाला एलईडी टीव्ही, मालिकावीराला दुचाकी दिली जाणार आहे. तसेच विजेता संघ मालक, उपविजेता संघ मालकाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.