चार हजार भारतीयांची घरवापसी

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या वर्षभरात तुरुंगवासाची मुदत संपल्यानंतर परदेशातून हजारो भारतीयांची करोना काळात विशेष विमानांद्वारे घरवापसी करण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या कोविड सेल युनिटने तयार केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. यातील बहुतेक नागरिकांना अमेरिका आणि कुवेत येथून भारतात पाठवण्यात आले आहे.

अमेरिका आणि कुवेतमधील 4,000 निर्वासित भारतीयांना परत पाठवण्यात आले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गेल्या वर्षी 7 मे रोजी वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. करोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना या मोहिमेद्वारे भारतात आणले गेले होते.

कुवेत सरकारतर्फे ही विमाने चालवण्यात आली होती. याअंतर्गत, व्हिसाची मुदत संपल्यानंतरही देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणार्‍या भारतात पाठविण्यात आले होते. कुवैत सरकारने या विमानांच्या उड्डाणांसाठी पैसे दिले आणि हे लोक भारतात परतल्यावर कामाच्या व्हिसासाठी पुन्हा अर्ज करू शकतात, असेही सांगितले. त्याच वेळी, भारतात परतणार्या दुसर्या प्रकारात परदेशात तुरुंगवासाची शिक्षा पूर्ण करुन येणारे लोक देखील होते.
केंद्राकडे परदेशातून भारतात येणार्‍या नागरिकांबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर अचानक मंत्रालयाच्या आढावा अहवालात वंदे भारत मोहिमेच्या कागदपत्रांमध्ये ही माहिती देण्यात आली. परप्रांतीय कामगारांना घरी पोहोचवण्याच्या कामात आणि परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी परवानग्या देण्याच्या कामात राज्य सरकारे व्यस्त होती. प्रवासी कामगारांना अजूनही त्रास सहन करावा लागत होता, असेही या अहवालात नमूद केले आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत परत येणार्‍या नागरिकांवरून राजकीय टीका होण्याची शक्यता होती.

Exit mobile version