वणव्यात चार चाकी जळून खाक

महाड फॉरेस्ट अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

| महाड | प्रतिनिधी|

महाड येथील शेडाव नाका नजीक महाडच्या महापुरात बुडून बंद अवस्थेत असणाऱ्या 3 वाहनांपैकी एका वाहनाला वणव्यामुळे आग लागली. ही आग ऐवढी भयानक होती की बंद अवस्तेत असणारी होंडा सिटी कार पुर्ण जळूण खाक झाली आहे. स्थानिक नागरीक तसेच पत्रकार मुदससिर पटेल यांनी इतर 2 वाहनांजवळ येणार्‍या वणव्याची आग विझवून मोलाचे योगदान दिले. कारण त्या दोन वाहनांपैकी एका कार मध्ये गॅस सिलेंडर होते आणि आग विझवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. थोड्याच वेळात महाड अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्यात आली. मात्र वणवा लागून ऐवढा मोठा प्रसंग घडून देखील महाड फॉरेस्ट अधिकारी या ठीकाणी न फिरकल्याने महाड शहरात वेगळ्या चर्चेला उधान आले आहे.

Exit mobile version