काका, मावशीकडून चार वर्षीय मुलीचा खून

कल्याण कोळसेवाडीतील गुन्ह्याची उकल कर्जतमध्ये

| नेरळ | प्रतिनिधी |

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात चार वर्षीय मुलगी हरविल्याची तक्रार मुलीच्या आत्याने दिली होती. कल्याण कोळसेवाडी पोलिसांच्या तपासात त्या मुलीचा खून झाल्याचे व तिच्या खुनामध्ये तिचा सख्या काका आणि मावशी यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. दरम्यान, मृत 4 वर्षीय मुलीच्या मृतदेहाचे अवशेष नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील चिंचवली येथून हस्तगत करण्यात आले आहेत. त्या मुलीचे काका तसेच मावशी यांना कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कल्याण कोळसेवाडी हद्दीत राहणारी एक विवाहित महिला हि दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह करून राहत होती. तसेच तिचा कारागृहात होता. त्यामुळे त्या महिलेच्या दोन मुली त्या महिलेच्या मामाकडे राहात होत्या. ऑगस्ट 2024 मध्ये दोन मुलींपैकी 4 वर्षीय लहान मुलगी ही कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे राहाणाऱ्या मावशीकडे, अपर्णा प्रथमेश उर्फ अमर कांबरी हिच्यासोबत तिच्या राहात्या घरी आली होती. मुलीचा मामा व अत्या तिची चौकशी व विचारपूस फोन करून करत असे. मात्र दोन महिन्यानंतर मुलीची चौकशी आणि विचारपूस करण्यासाठी फोन केला असता, मुलीचा काका हा मी बाहेर आहे, ती घरी आहे. अशा प्रकारची उत्तरे देत असल्याने मुलीचा मामा आणि आत्या तसेच इतर नातेवाईकांनी चिंचवली येथील मावशीच्या घरी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी मावशीचे घर बंद असल्याचे दिसुन आल्याने संशय निर्माण झाला होता.

परिणामी, संबंधित नातेवाईकांनी मुलगी हरविल्याची तक्रार कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ऑक्टोंबर 2024 रोजी दाखल केली होती. त्या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोललिसांनी तपास सुरू केला असता त्या मुलीचे काका आणि मावशी हे चिंचवली येथील राहाते घरातून फरार असल्याचे निष्पन झाले होते.
कोळसेवाडी पोलिसांनी त्या दोघांचा तपास सुरू केला असता, तब्बल 10 महिन्यांनी प्रथम मावशीला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर फरार काका प्रथमेश कांबरी याला दि. 11 ऑगस्ट रोजी नेरळ धामोते येथील एका चाळीतून ताब्यात घेतले. तसेच मुलीची चौकशी केली असता, तिला मारल्याची कबुली त्याने दिली. पोलिसांनी मुलीच्या मृतदेहाबद्दल विचारणा केली असता कर्जत-कल्याण राज्य मार्गाच्या शेजारी भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या शेजारील असलेल्या झाडीत टाकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्या चार वर्षीय मृत मुलीच्या मृतदेहाचे अवशेष हे आरोपीने दाखवलेल्या घटनास्थळावरुन हस्तगत केले. यावेळी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव, पोलीस उपनिरीक्षक मदने, हवालदार किरण मुसळे आणि खरात तसेच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक शेमडे, नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टर, सहकारी आणि पंच उपस्थित होते.

मारण्याचे कारण
लहान मुलीने एक-दोन वेळा पॅन्टमध्ये नैसर्गिक विधी केल्याचा राग आल्याने मला असह्य झाले आणि त्यामुळे तिला मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये तिचा जीव गुदमरला होता. त्यावेळी तिला डॉक्टरकडे नेले नाही. त्यातच तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तिचा मृतदेह पत्नी अपर्णा हिने गादीमध्ये गुंडाळून रात्रीच्या काळोखात कर्जत-कल्याण राज्य मार्गावरील भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या शेजारील असलेल्या झाडीमध्ये टाकल्याची कबुलीही आरोपी काका प्रथमेश कांबरी याने पोलिसांसमोर दिली आहे.
Exit mobile version