| पनवेल | वार्ताहर |
अल्पवयीन मुलीला लग्न करण्याचे वचन देऊन तिचा प्रेमभंग आणि विश्वासघात केल्याप्रकरणी आरोपी सुनील भगत यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्पवयीन मुलीने करंबेळी येथील खेळाच्या मैदानाच्या बाजूला असलेल्या पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी सुनील भगत यांने मृत मुलीला लग्न करण्याचे वचन दिले होते, मात्र आरोपीने दुसर्या मुलीला घरी आणून तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे मृत मुलीला सांगितले. त्यामुळे मानसिक तणावात आल्याने 14 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.







