कॅनडात चौथ्या लाटेचा इशारा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कॅनडामध्ये आरोग्य अधिकार्‍यांनी करोनाच्या डेल्टा विषाणूबाबत पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पुरेशा प्रमाणात नागरिकांचे लसीकरण होण्याआधी आणि घाईने सध्या लागू केलेले निर्बंध मागे घेतल्यास चालू वर्षाच्या उन्ह्याळ्याअखेरीस देशात डेल्टामुळे करोनाची चौथी लाट येऊ शकते, असा इशारा कॅनडाच्या मुख्य आरोग्य अधिकार्‍यांनी दिला आहे.

मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. थेरेसा टाम यांनी म्हटले आहे की, देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे रुग्णांचे मृत्यू कमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासण्याचे प्रमाणही कमी आहे. पण, रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेवर नव्याने ताण येऊ नये यासाठी लसीकरणाचे प्रमाण आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. किशोरवयीन मुलांना शक्य तितक्या लवकर लस दिली पाहिजे. त्यांच्यात लागण होण्याचे प्रमाण अन्य वयोगटांच्या तुलनेत कमी असले तरी त्यांच्यापासून रोगाचा सर्वाधिक प्रसार होत आहे.

Exit mobile version