कॅफे व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून फसवणूक

| नवीन पनवेल | वार्ताहर |

कॅफे व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून मोठ्या रकमा खर्च करायला लावल्या आणि कॅफेचा नफा न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्मिता भारत पाठारे आणि प्रितेश भारत पाठारे यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डेन्सि सीबी या खारघर सेक्टर 7 तेथे राहत असून स्मिता पाठारे या त्यांच्या पतीच्या बालपणीच्या शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा प्रितेश पाठारे हा बेलापूर येथे कॅफे चालवत असून त्याला खारघर येथे कॅफे सुरू करायचा होता. यावेळी सीबी व पाठारे यांच्यात भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्याचे ठरले. त्यानुसार त्यांनी 38 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. पैसे मागितले असता पैसे परत करणार नाही असे सांगितले. सेंटर पार्क जवळील भगवती ग्रीन टॉवर येथे कॅफे सुरू करण्याचे आमिष दाखवून नफा न देता फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version