नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

| पनवेल | प्रतिनिधी |

नोकरीच्या बहाण्याने 1 लाख 73 लाख 81 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, दि.28 मे ते जूनपर्यंत खारघर सेक्टर 7 येथील पंकज सिंग (23) याला आठ आरोपींनी शिपिंग कंपनीमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर तोतया कंपनीतील मालक आणि स्टाफ यांनी पंकजसह इतर 75 मुलांकडून 1 कोटी 73 लाख 81 हजार रुपये स्वीकारले. परंतु, कोणालाही नोकरीला लावले नसून सर्वांची फसवणूक केली. या प्रकरणी अंजली वर्मा, सत्यम वर्मा, अनुज सिंग, बादल रॉय, विकास रॉय, कशिश, रीना, माधुरी यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version