| पनवेल | वार्ताहर |
होलसेल दरात किराणा सामान, कपडे आणि घरगुती वस्तू देण्याचे आमिष दाखवून 3 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी नवीन धनाजी पांचाळ आणि विद्या धनाजी पांचाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोमल सूर्यवंशी या हेदूटने, पडघे येथे राहत असून, एक महिन्यांपूर्वी त्यांच्या सोसायटीमध्ये विद्या पांचाळ व नवीन पांचाळ हे भाड्याने राहण्यासाठी आले. त्यावेळी त्यांची गुजरातमध्ये कंपनी असून ते किराणामाल, कपडे व घरगुती वस्तू कमी दरामध्ये देत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे किराणामाल ऑर्डर केला असता त्यांनी कमी दरात किराणामाल आणून दिला. त्यानंतर इतर काही जणांनी त्यांच्याकडे किराणा मालाची ऑर्डर दिली. या मालासाठी कोमल यांनी 2 लाख 43 हजार रुपये, श्रीदेवी मठपती यांनी 63, 492 आणि दीपा अलमद यांनी 78,793 रक्कम यूपीआयद्वारे ट्रान्सफर केली. यावेळी माल 23 जुलैपर्यंत डिलिव्हरी होईल असे सांगितले. त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र फोन बंद येऊ लागला आणि घराला कुलूप असल्याने संपर्क होऊ शकला नाही. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पाले बुद्रुक गावातील वीरेंद्र कुमार, विलास चौधरी, उदय शिरसेकर यांची देखील त्यांनी फसवणूक केले असल्याचे समजले.
होलसेल दरात वस्तू देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809