। पनवेल । वार्ताहर ।
एटीएम कार्डची अदलाबदल करून 45 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानस समल रा. तळोजा फेज वन हे कळंबोली येथील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. ते पैसे काढत असताना एटीएम सेंटरमध्ये असलेल्या दोघांपैकी हेल्मेट घातलेल्या एकाने मशीनमध्ये पिन टाकत असताना पिन क्रमांक पाहून घेतला. तसेच यात पैसे नाहीत, असेही त्यांने सांगितले. त्यानंतर चेक करतो, असे सांगत दुसऱ्या व्यक्तीने समल याच्याकडील एटीएम कार्ड पुन्हा मशीनमध्ये टाकले आणि यात पैसे नाही, असे बोलून दोघे निघून गेले. समल याने दोन वेळा पिन टाकला असता मशीन चुकीचा पिन असल्याचे दर्शवत होते. त्याने कार्ड पाहिले असता एटीएम कार्ड त्याचे नसल्याचे समजले. त्यांनी बाहेर जाऊन दोन्ही व्यक्तींचा शोध घेतला, मात्र ते निघून गेले होते. त्यानंतर 45 हजार रुपये एटीएम सेंटरमधून काढल्याचा मेसेज त्यांना आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठले.







