| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा तालुका शहरात नामांकित व्यापाऱ्याला दि.15 मे रोजी बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे भासवून तब्बल 15 लाख रुपयांचा गंडा घातला होता. दरम्यान, फसवणूक करणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. या आरोपींमध्ये केसाराम सावजी बागरी (47), मोहनलाल गंगाराम परमार (42), राजू शिलाराम राठोड (27), अनिल हरिराम परमार (26) आणि जितेंद्रकुमार मोहनलाल परमार (27) यांचा समावेश असून, हे सर्व मूळचे राजस्थान राज्यातील जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि.23) रात्रीच्या सुमारास रोहा तालुक्यातील किल्ला येथून ताब्यात घेतले. म्हसळा पोलिसांनी या प्रकरणी शिताफीने तपास करून गजाआड केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बनावट दागिन्यांनी लाखोंची फसवणूक
