| नवी मुंबई | वार्ताहर |
घराच्या लाईटचे बिल भरले नसल्याचे सांगून पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून एका सायबर चोराने वाशी सेक्टर-17 मध्ये राहणार्या एका वृद्ध महिलेला गंडा घातला आहे. या वेळी बिल भरण्याच्या बहाण्याने तिच्या मोबाईलवर एनी डेस्कचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून खात्यातून 76 हजारांची रक्कम परस्पर लांबवली आहे. याबाबतचे संदेश अंजली वजीर यांच्या मोबाईलवर आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या बाबत अधिक पोलीस अधिकारी करत आहेत.