वृद्ध महिलेची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरात एका 85 वर्षीय प्रभावती साखरे (रा.मंगला निवास, गोडसे आळी) या भाजी घेऊन महाराष्ट्र बँकेच्या समोर झाडाखाली बसल्या असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांना पिण्यास पाणी दिले. त्यानंतर 500 रुपये देऊन ते रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या व गळ्यात असलेली सोन्याची माळ असा जवळपास तीन लाखांचा ऐवज काढून घेऊन ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version