| पनवेल | वार्ताहर |
मुंबई उपनगरातील एका व्यावसायिकाची संगणक व्यवसायातून 10 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. कंपनीचे अधिकारी आणि संचालकांनी ही फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संगणकाची सुटे भाग विक्री करणारे 41 वर्षीय संदीप जैन यांनी याबाबत पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर 2018 ते मे 2019 या दरम्यान ही फसवणूक झाली. जैन यांना संबंधित कंपनीने केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा पाच राज्यासह नेपाळ या देशात मुख्य वितरक म्हणून नेमणूक करु असे आश्वासन दिले होते. त्यामुळे जैन यांनी त्या कंपनीत 10 कोटी 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. यातील 26 लाख रुपये जैन यांना परत केले. मात्र उर्वरित रक्कम 10 कोटी 34 लाख रुपये परत न करता आणि वितरणाचे हक्क न दिल्याने जैन यांनी अनेक महिने कंपनीच्या संचालकांकडे रकमेची मागणी केली. मात्र, रक्कम परत न केल्यामुळे खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.