| पनवेल | वार्ताहर |
अॅपद्वारे आणि क्रेडिट कार्डचा ऑनलाइन अॅक्सेस प्राप्त करून एक लाख 65 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापिकाला व्हॉट्सअॅपमध्ये इंग्रजीत लिंक आली व बँकेचे अॅप डाऊनलोड करा व लिंक ओपन केली नाही तर अकाउंट बंद होईल असा मेसेज आला. त्यांनी ती लिंक ओपन केली यावेळी नाव व पॅन कार्ड नंबर टाकून झाल्यानंतर सर्व माहिती मागण्यात आली. त्यांना संशय आल्याने बाकीची माहिती भरली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांनी त्या घरी गेल्या असता, त्या पत्त्यावर क्रेडिट कार्ड आल्याचे समजले. या क्रेडिट कार्ड वरून 62 हजार रुपयांची शॉपिंग झाल्याचे समजले, त्यांनी कस्टमर केअर सोबत संपर्क साधून कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले. एक लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.