महिलेची साडेआठ लाखांची फसवणूक

। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील कोंडीवली येथील महिलेला ‘तुम्ही कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात 40 लाख रूपये जिंकले आहे. तुम्हाला रकमेवरील टॅक्ससाठी 8 लाख 76 हजार 500 रू. भरावे लागतील, असा निनावी फोन करून महिलीची फसवणूक केली. याप्रकरणी आकाश वर्मा नामक व्यक्तीवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतच मुदतीत घडली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत गडदे करीत आहेत. याप्रकरणी सईद जमालऊद्दीन कामाला, रा कोंडीवली, ता. खेड यांनी फिर्याद दाखल केली.

Exit mobile version