। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
चंद्रपूर, भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी, बिल्डर व एजंट यांनी संगनमत करून अधिकचे गृहकर्ज मिळावे यासाठी, 44 जणांनी बनावट आयकर रिटर्न तयार करून अधिकचे कर्ज वितरीत करून स्टेट बँक ऑफ इंडियाची 14 कोटी 26 लाख रूपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत 16 जणांविरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यामध्ये स्टेंट बँकेचे दोन व्यवस्थापक, कर्मचारी, एजंट तथा कर्जदार यांचा समावेश आहे. याप्रकरणात शहरातील नामांकित बिल्डरांची नावे समोर येत आहेत. त्यामुळे बिल्डर लॉबीत खळबळ उडाली आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे एसबीआयची फसवणूक
