। पनवेल । प्रतिनिधी ।
एपीके फाईल पाठवून पीडित व्यक्तीच्या मोबाईलचा ताबा घेऊन सायबर चोरट्याने 2 लाख 1 हजार 800 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना कामोठे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र जाधव हे कामोठे येथे राहत असून, अज्ञात सायबर चोरट्याने त्यांना तुमचे महानगर गॅस कनेक्शन बिल न भरल्यामुळे बंद होईल, अशी भीती दाखवली आणि त्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एपीके फाईल पाठवली. ती फाईल ओपन केली असता, अज्ञात सायबर चोरट्याने जाधव यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख एक हजार आठशे रुपये रक्कम टप्याटप्याने वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी जाधव यांच्या तक्रारीवरून कामोठे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
एपीके फाईल पाठवून दोन लाखांची फसवणूक
