। पनवेल । प्रतिनिधी ।
एका व्यापाऱ्याच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने आरटीओ चलनची डॉट एपीके फाईल पाठवून त्याद्वारे सदर व्यापाऱ्याची 4 लाख 23 हजार 98 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यातील तक्रारदार यांचे मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने आरटीओ चलनची डॉट एपीके फाईल पाठवून ते तक्रारदाराकडून ओपन केली असता त्यांचे मोबाईलमध्ये आरटीओ चलन नावाचे ॲप डाऊनलोड करून त्यांचे मोबाईलचे ॲक्सेस स्वतःकडे घेऊन तक्रारदारास माहीत नसताना तक्रारदाराच्या बँक सेव्हींग खात्यामधून एकुण 3,74,598/- व दुसऱ्या बँक खात्यामधून 48,500 /- स्वतःचे बॅक खात्यात घेऊन तक्रारदाराची एकुण 4,23,098/- ची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.






