। पनवेल । प्रतिनिधी ।
घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनोळखी चोरट्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपूर्वा गुडेवार या सेक्टर-17, खारघर येथे राहतात. त्यांनी त्यांच्या वॉचमनला घराची चावी देऊन त्या पुण्याला गेल्या होत्या. दरम्यान, त्या परत आल्या व त्यांनी वॉचमनकडील चावी घेऊन घर उघडले असता त्यांना घरातील कपाटाचा दरवाजा उघडा असल्याचे व त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तसेच बेडरूममधील कपाटही उघडे होते, मात्र, घरातील वस्तूंची चोरी झाल्याचे आढळले नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता वॉचमनचा मित्र रोशन याने टी-शर्टने तोंड झाकून सीसीटीव्हीचा स्विच ऑफ केलेला दिसून आले. यावरून वॉचमेनने त्यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.







