| नवीन पनवेल | प्रतिनिधी ।
20 यु एस डॉलरच्या 500 नोटा एक्सचेंज करण्यासाठी देतो असे सांगून 2 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळंबोली येथील शफीकुल, रफिक आणि आणखी एका व्यक्तीविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली येथील रोहित राजबहादूर गौतम याला अरमानो आर डाऊन टाऊन लोधा-पलावा परिसरातील तलावाजवळ तीन व्यक्तह भेटले. त्यांनी 20 युएस डॉलरच्या 500 नोटा एक्सचेंज करण्यासाठी देतो असे सांगून त्यांना कळंबोलीतल सिटी हॉस्पिटल येथे बोलावले. मात्र, आरोपींनी रोहित यांला कागदी पेपर रोल देऊन त्याची 2 लाखांची आर्थिक फसवणूक केली.
दोन लाखांची फसवणूक

xr:d:DAFiUNjonyk:4,j:46679222290,t:23050809